Nashik Murder : आंबा विक्रीतून आलेले पैसे मुलाने खर्च केल्याने बापाकडून मुलाचा खून

Murder Case pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सुरगाणा तालुक्यातील डोल्हारे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सुभाषनगर येथे आंब्याची बाग विकून आलेली रक्कम मुलाने परस्पर खर्च केल्याच्या वादातून बापानेच मुलाचा खून करण्याची घटना घडली. याबाबत सुरगाणा पोलिसानी पंडित झुलू गवळी यास अटक केली असून त्यास एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विलास याने आंबा विक्रीतून आलेले २१ हजार रुपये परस्पर खर्च केले होते. त्यावरून त्याचे वडील पंडित गवळी यांच्याशी भांडण झाले. त्या संतापातून पंडीत गवळी यांनी मुलगा विलास गवळी (३७) याचा ३० एप्रिलला सायंकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान दगडाने ठेचून खून केला. याबाबत सुरगाणा पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना डोल्हारेचे सरपंच शंकर गावित यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत सुरगाणा पोलिस ठाण्यात संपर्क साधला. घटनास्थळी सुरगाणा पोलिसांनी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात पाठवला. बुधवारी (दि.१) शवविच्छेदन करुन दुपारी सुभाषनगर येथे शोकाकूल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला. आरोपी पंडित झुलू गवळी यास पोलिसांनी दिंडोरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. याबाबत पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुचित पाटील, शिवराम गायकवाड, कैलास मानकर, नितीन ढेपले तपास करत आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.