Nashik Sinner Accident : अपघातातील दहा मृतांची ओळख पटली, ड्रायव्हरस दोन चिमुकले दगावले

नाशिक सिन्नर शिर्डी अपघात

नाशिक : (सिन्नर)

सिन्नर शिर्डी महामार्गावर आज पहाटे (दि. 13) पाथरे गावाजजवळ खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात 10 प्रवाशांचा मृत्यू झाला असून त्या दहाही जणांची ओळख पटली आहे. तर 18 जण जखमी असून त्यांच्यावर सिन्नर येथील दोन खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अपघाताती मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली असून या अपघाताची चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. तसेच पालकमंत्री दादा भुसे व जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांनी सिन्नर येथे जाऊन अपघातातील जखमी रुग्णांची विचारपूस केली. तर मृतांमध्ये एक सात वर्षाचा चिमुकला व एक 9 वर्षाची चिमुकली दगावली आहे.

सर्व मृतांची नावे अशी

1. दीक्षा गोंधळी, वय 17
2. प्रतीक्षा गोंधळी, वय 45
3. श्रावणी भारस्कर, वय 35
4. श्रद्धा भारस्कर, वय 9
5. नरेश उबाळे, वय 38
6. वैशाली नरेश उबाळे, वय 32
7. चांदनी गच्छे,
8. बालाजी कृष्ण महंती, वय 28
9. अंशुमन बाबू महंती, वय 7
10. रोशनी राजेश वाडेकर, वय 36

The post Nashik Sinner Accident : अपघातातील दहा मृतांची ओळख पटली, ड्रायव्हरस दोन चिमुकले दगावले appeared first on पुढारी.