Sahitya Sammelan : ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी डॉ. शोभणे

डॉ. रवींद्र शोभणे www.pudhari.news

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क

अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिक तथा विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांची निवड करण्यात आली आहे. येत्या आगामी वर्षात २०२४ मध्ये दि. २ ते ४ फेब्रुवारी या कालावधीत हे संमेलन पार पडणार आहे.

डॉ. रवींद्र शोभणे यांच्याबद्दल…

डॉ. शोभणे हे मूळचे नागपूरचे असून नागपूरच्या नरखेड तालुक्यातील खरसोली या गावात त्यांचा जन्म झाला. आदर्श विद्यालयातून त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले. पुढे नागपूरच्या मॉरिस कॉलेजात त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले. तर १९९१ मध्ये त्यांचा पहिला कथासंग्रह आला. वर्तमान नावाचा हा कथासंग्रह असून १९८९ मध्ये त्यांनी पीएचडी मिळवली. डॉ. रवींद्र शोभणे यांना त्यांच्या साहित्यसंपदेमुळे अनेक प्रकारचे सन्मान प्राप्त झाले आहेत. २००३ मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे भरलेल्या विदर्भ साहित्य संघाच्या पहिल्या युवा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. डॉ. शोभणे यांना साहित्य अकादमीची प्रवासवृत्ती १९९४ साली प्राप्त झाली होती. मराठी भाषा साहित्य अकादमीमध्ये सल्लागार सदस्य म्हणून २००७ ते २०१२ यादरम्यान ते कार्यरत होते. डॉ. रवींद्र शोभणे यांच्या निमित्ताने वैदर्भीय प्रतिभेची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्या निवडीचे स्वागत होत आहे.

हेही वाचा:

The post Sahitya Sammelan : ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी डॉ. शोभणे appeared first on पुढारी.