नाशिक : पुढारी वृत्तसेवा– लोकसभा निवडणूकीत शुक्रवारी (दि.३) अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी केली. नाशिक मतदारसंघातून २८ तर दिंडोरीमधून १३ ऊमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यामध्ये प्रामुख्याने ठाकरे गटाचे बंडखोर विजय करंजकर, वंचितेचे करण गायकर व मालती थविल, शांतीगिरी महाराज आदींचा समावेश होता.
लोकसभा निवडणूकीत पाचव्या टप्यात २० मे रोजी नाशिक व दिंडाेरी मतदारसंघासाठी मतदान पार पडणार आहे. या दोन्ही मतदारसंघासाठी अर्ज भरण्याची मुदत शुक्रवारी संपुष्टात आली. अखेरच्या दिवशी नाशिकमधून २५ उमेदवारांनी २८ अर्ज दाखल केले. तर दिंडोरीमधून ११ जणांनी १३ अर्ज भरले. त्यानूसार दोन्ही मतदारसंघामधून शेवटच्या दिवशी ३६ उमेदवारांचे एकुण ४१ अर्ज प्राप्त झाले.
दरम्यान अर्ज दाखल करायच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत नाशिकमध्ये ३९ उमेदवारांनी एकुण ५६ तर दिंडोरीतून २० उमेदवारांनी २९ अर्ज दाखल केले आहेत. त्यानुसार दोन्ही मतदारसंघातून अखेरच्या क्षणापर्यंत ५९ उमेदवारांनी एकुण ८५ नामनिर्देशन पत्र सादर केले. सोमवारी (दि.६) अर्ज माघारीपर्यंत सदर बंडखोरांचे बंड थोपविण्याचे आव्हान युती व आघाडीपुढे असणार आहे.
आज अर्ज छाननी
नाशिक व दिंडोरी मतदारसंघातून दाखल अर्जांची शनिवारी (दि.४) सकाळी ११ पासून छाननी करण्यात येणार आहे. नाशिकची छाननी प्रक्रिया निवडणून निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या दालनात होईल. तर दिंडोरीची छाननी नियाेजन भवन येथे निवडणून निर्णय अधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.
नाशिकमधून एकुण दाखल अर्ज
हेमंत गोडसे (शिवसेना शिंदे गट), राजाभाऊ वाजे (शिवसेना ठाकरे गट), करण गायकर (वंचित बहुजन आघाडी), शांतीगिरी महाराज, स्वामी सिद्धेश्वरानंद गुरु स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती, विजय करंजकर, निवृत्ती अरिंगळे, जितेंद्र भाभे, चंद्रकांत ठाकूर, वामन सांगळे, आरीफ मन्सुरी, दीपक गायकवाड, अरुण काळे, अमोल कांबळे, तिलोत्तमा जगताप, यशवंत पारधी, भाग्यश्री अडसुळ, शशिकांत ऊन्हवणे, चंद्रकांत पुरकर, अनिल जाधव, गणेश बोरस्ते, सोपान सोमवंशी, किसन शिंदे, जयदेव मोरे, भिमराव पांडवे, सुषमा गौराणे, कोळप्पा धोत्रे, दत्तात्रय देवरे, जयश्री पाटील, देविदास सरकटे, कमलाकर गायकवाड, कैलास चव्हाण, कांतीलाल जाधव, दर्शना मेढे, झुंझार आव्हाड, प्रकाश कनोजे, भक्ती गोडसे, धनाजी टोपले, सुधीर देशमुख.
दिंडोरीतून एकुण दाखल अर्ज
जे. पी. गावित (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी), सुभाष चाैधरी (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी), भास्कर भगरे (राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी शरद पवार गट), शिवाजी बर्डे (भारत आदिवासी संघटना), पल्लवी भगरे (राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी शरद पवार गट), बाबू भगरे (अपक्ष), डॉ. भारती पवार (भाजपा), हरिशचंद्र चव्हाण (अपक्ष), भारत पवार (बहुजन रिपब्लिकन साेशलिस्ट पार्टी), धोंडीराम थैल (बळीराजा पार्टी), संजय चव्हाण (अपक्ष), तुळशीराम खोटरे (बहुजन समाज पार्टी), अनिल बर्डे (अपक्ष), मालती थविल (वंचित बहुजन आघाडी), गुलाब बर्डे (प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी), काशिनाथ वटाणे (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन), अशोक घुटे (अपक्ष), किशोर डगळे (आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया), खान गाजी ईकबाल अह. (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन), दीपक जगताप (अपक्ष).
हेही वाचा –