अपहृत परप्रांतीय मुलीची नाशिकमध्ये सुटका, दोघा अपहरणकर्त्यांना पकडलं

मुलीचे अपहरण,

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- उत्तरप्रदेश येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अपहरणकर्त्यांनी तिला नाशिकला आणले. याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकास मिळाल्यानंतर पोलिसांनी अपहृत मुलीची सुटका करीत दोघा अपहरणकर्त्यांना पकडले आहे.

संशयित गोरख मिठ्ठु बिंद (२१) व अभिषेक गोपाल मौर्या (दोघे रा. जि. चंदौली, राज्य उत्तरप्रदेश) यांनी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून नाशिकला आणले होते. तिघेही शहरातील अंबड येथील दत्तनगर परिसरात राहत होते. गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजय पगारे, सहायक उपनिरीक्षक विवेक पाठक, भारती देवकर, हवालदार प्रकाश महाजन, सुनील आहेर यांच्या पथकाने तपास करीत अपहृत मुलीची सुटका केली. तर दोघांना ताब्यात घेत अंबड पोलिसांकडे सोपवले आहे.

हेही वाचा :

The post अपहृत परप्रांतीय मुलीची नाशिकमध्ये सुटका, दोघा अपहरणकर्त्यांना पकडलं appeared first on पुढारी.