अमित शहा 27 व 28 जानेवारीला नाशिक दौऱ्यावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक्स परिषद 2023-24 चे आयोजन आपल्या जिल्ह्यात होत आहे. ही आपल्या सर्वांसाठी चांगली संधी आहे. 27 व 28 जानेवारी रोजी होणाऱ्या सहकार परिषदेचे उद्घाटन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार असल्याने सर्व संबंधित यंत्रणांनी या दौऱ्याचे समन्वयाने नियोजन करावे, अशा सूचना केंद्रीय आरोग्य, कुटुंब कल्याण व जनजातीय विकास राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिल्या.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांनी आज दूरदृष्यप्रणालीद्वारे सहकार परिषदेच्या उद्घाटना निमित्त केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या तयारीचा आढावा घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी नाशिक महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहकार परिषदेचे अध्यक्ष अजय ब्रम्हेचा, सहकार परिषदेचे आयोजक विश्वास ठाकुर यांच्यासह संबंधित यंत्रणांचे अधिकारी व पदाधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

डॉ.पवार म्हणाल्या, या सहकार परिषदेच्या निमित्तीने सहकार क्षेत्रातील महाराष्ट्राचे नेतृत्व नाशिक जिल्हा करणार आहे, ही आपल्या सर्वांसाठी खूप मोठी संधी आहे. तसेच या परिषदेच्या उद्घाटनाला केंद्रीय गृह व सहकार मंत्री येणार असल्याने त्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने कार्यक्रमांचे नियोजन करण्यात यावे. तसेच या परिषदेला येणाऱ्या कोणाची ही गैरसोय होणार नाही. त्याचप्रमाणे केंद्रीय गृह व सहकार मंत्री यांच्या आगमनाच्या वेळी विशेष काळजी घेण्याच्या सूचना ही केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी योवळी दिल्या.

हेही वाचा :

The post अमित शहा 27 व 28 जानेवारीला नाशिक दौऱ्यावर appeared first on पुढारी.