निफाडमध्ये द्राक्ष बागांच्या संरक्षणासाठी पेटवल्या शेकोट्या

द्राक्षबागेत पेटवल्या शेकोट्या www.pudhari.news

लासलगाव (जि. नाशिक) वृत्तसेवा – गेल्या तीन दिवसांपासून वातावरणात पुन्‍हा गारवा जाणवू लागला आहे. गुरुवारी (ता. २५) नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्याचे किमान तापमान ४.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. निफाड तालुक्यातील किमान तापमानात रोज घसरण होत असल्याने नागरिक चांगलेच गारठले आहे.

यंदाच्‍या हिवाळी हंगामात अपेक्षित थंडी पडलेली नसल्‍याने नागरिकांना थंडीचा आनंद घेता आलेला नव्हता. मात्र गेल्या तीन दिवसांपासून पारा चांगलाच घसरला असून एकदाच पारा ४.४ अंश सेल्सिअस खाली गेलेला आहे. वातावरणात वाहत असलेल्‍या थंड वाऱ्यामुळे चांगलाच गारवा जाणवू लागला होता.

जिल्ह्य़ात नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यात थंडीचे प्रमाण कमी होते मात्र जानेवारी महिना उजाडताच मागील काही दिवसांपासून तपमानात चढ उतार सुरू आहे अजून ही घसरण अशीच सुरू राहील्यास त्यामुळे थंडीच्या प्रमाण वाढत राहीली तर तयार झालेल्या द्राक्ष मण्याना तडे जाण्याची शक्यता अधिक आहे. या साठी कडाक्याच्याथंडीत द्राक्ष बागा वाचविण्यासाठी पहाटेच्या वेळेस ठिबक द्वारे विहिरीचे पाणी देणे शेकोटी पेटवून धुर करून उब तयार करून असे विविध उपाय द्राक्ष उत्पादक शेतकरी करीत आहेत.

दिवसा ऊन आणि रात्री थंडी असे वातावरण असतानांच थंडीचे प्रमाणात अचानक वाढ झाली आहे. त्यातच पहाटेच्या सुमारास पडणारे दाट धुके व दव बिंदू यामुळे दिवसभर थंड वातावरण असल्याने रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदे अशा पिकांना पोषक वातावरण असले तरी द्राक्ष बागेला मात्र ह्या वातावरणाचा फटका बसत आहे. सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे द्राक्ष मण्यांच्या फुगवनीवर याचा
परिणाम होत असल्याने शेतकरी बागा वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे द्राक्ष उत्पादक शेतकरी सुनील गवळी यांनी सांगितले.

हेही वाचा :

The post निफाडमध्ये द्राक्ष बागांच्या संरक्षणासाठी पेटवल्या शेकोट्या appeared first on पुढारी.