अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचे नाशिकमध्ये पडसाद, आपचे कार्यकर्ते आक्रमक

आप आंदोलन,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आम आदमी पक्षाचे नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर राज्यभरात आपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.  नाशिकमध्येही शुक्रवारी (दि. २२) त्याचे पडसाद उमटले.

आप कार्यकर्त्यांनी येथील मेहेर चाैकात अर्धा तास ठिय्या मांडून तसेच टायर जाळून केंद्र सरकारचा निषेध नोंदविला. ‘नही चलेगी नही चलेगी मोदीशाही नही चलेगी’, ‘नरेंद्र मोदी मुर्दाबाद’, ‘जब जब मोदी डरता है पुलीस को आगे करता है’ यांसारख्या दिलेल्या घोषणांंनी परिसर दणाणून गेला होता. कार्यकर्त्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.

हिंमत असेल तर पोलिसांनी राज्यातील भ्रष्टाचारी नेत्यांना अटक करावी, असे आव्हान कार्यकर्त्यांकडून देण्यात आले. आपच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी कार्यकर्त्यांनी आक्रमक होत थेट मेहेर चाैकात मोर्चा वळविला. कार्यकर्त्यांनी रस्त्यातच ठिय्या मांडत टायर जाळले. परिणामी, मेहेर ते सीबीएस चौक अशी वाहतूक ठप्प झाली. यावेळी शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांना निषेधाचे निवेदन दिले.

हेही वाचा :

The post अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचे नाशिकमध्ये पडसाद, आपचे कार्यकर्ते आक्रमक appeared first on पुढारी.