निफाड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा -निफाड येथील एका युवकाने व्हाट्सअपवर निफाडचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करून त्यांची बदनामी केल्या प्रकरणी निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत मिळालेला अधिक माहितीनुसार, निफाड येथील 30 वर्षीय तरुण, समाधान अशोक कुंभार्डे याने ‘निफाड चे राजकारण’ या व्हाट्सअप ग्रुपवर निफाडचे विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या बद्दल -” दोन वेळा गद्दारी करतो आणि तालुक्यात बॅनर लावतो” अशा आशयाचा आक्षेपार्ह मजकूर प्रसरित करून आमदार बनकर यांची बदनामी केल्याने भारतीय दंड विधान कायदा कलम 500 अन्वये निफाड पोलीस ठाण्यात संशयित आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीकडून असे कृत्य पुन्हा घडू नये यासाठी कलम 151 नुसार प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून त्यास अटक करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा :
- Ashneer Grover : ‘शार्क टँक’फेम अश्नीर ग्रोवर यांना ‘यूके’ला जाण्यास मज्जाव!
- Rahul Gandhi | धुळ्यात राहुल गांधीचा होणार रोड-शो, अभूतपूर्व तयारी सुरु; दिल्लीत पडसाद उमटविण्याचा निर्धार
The post आमदार दिलीप बनकर यांची सोशल मीडियावर बदनामी, एकाला अटक appeared first on पुढारी.