नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आयपीएलमधील सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या सात जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे. संशयित सनरायझर्स हैदराबाद व राजस्थान रॉयल्स सामन्यावर सट्टा लावत असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार त्यांनी ओझर येथील दहावा मैल परिसरातून सुरुवातीस भव्य चैतन्य दवे (२५, रा. दहिसर, मुंबई) व जतीन नविन सहा (४१, रा. ठाणे पश्चिम) या दोघांना पकडले. दोघांकडून ४ मोबाइल, कॅलक्युलेटर असा २२ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोघांकडील सखोल चौकशीतून पोलिसांनी मुंबईतील पाच संशयितांना पकडले. त्यात प्रथम सुचक, विनोद गुप्ता, रमेश जयस्वाल, विशाल मडियॉ, निखील विसरीया यांना पकडले आहे.
हेही वाचा –