‘ईद मुबारक’ आज ईद-उल-फित्र; सर्वत्र उत्साहाचे वातावरण

eid pudhari.news

जुने नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजान पर्वाची बुधवारी सांगता झाली. गुरुवारी (दि.११) ईद-उल-फित्र साजरी होत आहे. शहरातील शाहजहानी इदगाह मैदानावर खतीब-ए-शहर हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वात सकाळी दहा वाजता सामुदायिक नमाज पठण होणार आहे.

ईदच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, बुधवारी (दि. १०) सायंकाळी रमजानचा ३० वा रोजा सोडताच बाजारामध्ये गर्दी उसळली होती. अत्तर, टोपी, सुरमा आदी साहित्याची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. चंद्रदर्शन घडताच शिरखुर्मासाठी लागणाऱ्या म्हशीच्या दुधाच्या मागणीत वाढ झाली. तशी किंमतही वधारली.

हसनैन फाउंडेशनतर्फे गरजूंना मदत
जुने नाशिकमधील मुल्तानपुरा, काजीपुरा, जोगवाडा, नाईकवाडीपुरा इत्यादी भागांत हसनैन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शकील तांबोळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी गरजूंना दररोज सहेरीसाठी लागणारे खाद्यपदार्थ वाटप केले.

ईद pudhari.news
जुने नाशिक : सारडा सर्कल येथे रमजान ईदच्या पूर्वसंध्येला दूध घेण्यासाठी झालेली गर्दी. (छाया : कादिर पठाण)

हेही वाचा:

The post 'ईद मुबारक' आज ईद-उल-फित्र; सर्वत्र उत्साहाचे वातावरण appeared first on पुढारी.