‘ईव्हीएम’साठी पंधराही तालुक्यांना स्ट्राँगरूम

स्ट्राँगरूम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. १५ ही तालुका स्तरावर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्स‌चे जतन करण्यासाठी स्ट्राॅंगरूम सज्ज करण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरी तसेच धुळे- मालेगाव लोकसभा मतदारसंघासाठी २० मे राेजी मतदान घेण्यात येणार आहेत. यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासह मतदान निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी यंत्रणा कामाला लागल्या आहेत. जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघासाठी येत्या १५ ते २१ एप्रिल या कालावधीत ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन्स‌चे वाटप केले जाणार आहे. सय्यद पिंप्री येथील गोदामातून हे मशीन्स वितरित केले जातील. तसेच १५ ही मतदारसंघांत तालुक्याच्या ठिकाणी हे मशीन्स जतन करण्यासाठी स्ट्राॅंगरूम उभाण्यात आल्या आहेत. या स्ट्राॅंगरूमला निवडणूक आयाेगाने मान्यता दिली आहे.

असे आहेत स्ट्राॅंगरूम

नांदगाव : तहसील कार्यालय परिसर, नांदगाव

मालेगाव मध्य : छत्रपती शिवाजी जिमखाना, श्रीरामनगर, मालेगाव

मालेगाव बाह्य : महाराष्ट्र वखार गोदाम, कॅम्प रोड, मालेगाव

बागलाण : जिजामाता गर्ल्स हायस्कूल, सटाणा

कळवण : मध्यवर्ती प्रशासकीय सभागृह, पंचायत समिती, कळवण

चांदवड : पहिला मजला, मध्यवर्ती प्रशासकीय सभागृह, चांदवड

येवला : तहसील कार्यालय, येवला

सिन्नर, : नवीन प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय परिसर

निफाड : मध्यवर्ती इमारत, रसलपूर शिवार, निफाड

दिंडोरी : मविप्र महाविद्यालय, उमराळे रोड, दिंडोरी

नाशिक पूर्व : विभागीय क्रीडा संकुल, पंचवटी

नाशिक मध्य : दादासाहेब गायकवाड सभागृह, भाभानगर

नाशिक पश्चिम : संभाजी स्टेडियम, अश्विननगर सिडको

देवळाली : गोदावरी हॉल, बांधकाम भवन, त्र्यंबक राेड, नाशिक

इगतपुरी-त्र्यंबक : सिंहस्थ कुंभमेळा हॉल, नवीन पोलिस स्टेशन इमारत, त्र्यंबकेश्वर

हेही वाचा –

The post 'ईव्हीएम'साठी पंधराही तालुक्यांना स्ट्राँगरूम appeared first on पुढारी.