एचएनजी कारखान्यात भट्टीचा स्फोट

सिन्नर स्फोट www.pudhari.news

सिन्नर : पुढारी वृत्तसेवामाळेगाव एमआयडीसीतील हिंदुस्तान नॅशनल ग्लास या कंपनीतील भट्टी फुटून भीषण आग लागली. शुक्रवारी (दि. २९) रात्री 8\30 च्या सुमारास ही घटना घडली. सिन्नर नगर परिषद व एमआयडीसीच्या अग्निशमन दलाचे बंब आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत होते. कंपनी व्यवस्थापन, आजूबाजूचे कामगार, नागरिक व पोलिसही मदतीला धावले. संपूर्ण माळेगाव औद्योगिक वसाहतीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये धूर पसरला होता. रात्री उशिरापर्यंत आग धुमसत होती. निमा पदाधिकारीदेखील घटनास्थळी दाखल झाले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भट्टीच्या आसपास कामगार नसल्याचे समजते. तथापि कारखान्याची अग्निशमन यंत्रणा बंद असल्याने अग्निशमन बंबांना थेट सिन्नर येथून पाणी आणावे लागले. भट्टीच्या भीषण स्फोटामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला असून, सगळीकडे अंधार पसरला आहे. त्यातच आगीच्या ज्वाला आकाशाकडे झेपावत असल्याने भीषण आगीचे रौद्ररूप दिसत आहे.

हेही वाचा :

The post एचएनजी कारखान्यात भट्टीचा स्फोट appeared first on पुढारी.