ऑनलाइन पेमेंटचा खोटा मॅसेज दाखवून फसवणारा जेरबंद

arrested nashik crime

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा – कापड दुकानदाराची फसवणुक करणाऱ्या एका संशयितास जेरबंद करण्यात आडगाव गुन्हे शोध पथकास यश आले असून या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मयुर निकम करीत आहेत. यासिम रहमान शेख (वय ३७, रा. प्लॉट नं २५, १० नं. रोड, हक्कानी मजिद, गोवंडी) हे ताब्यात घेतलेल्या संशयितांचे नाव आहे.

याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, नाशिकरोड परिसरातील जय भवानी रोडवर ईश्वर शांतीलाल वर्मा हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. वर्मा यांचे जत्रा हॉटेल चौफुली येथे कपड्याचे दुकान आहे. या ठिकाणी ३ मे २०२४ रोजी संशयिताने दोन पँट, तीन टी शर्ट, एक लेडीज टी शर्ट असा एकुण जवळपास १० हजार रुपये किमतीचे कपडे खरेदी केले.  हे बिल आनलाइन भरल्याचा खोटा मेसेज दाखवून सेल्स गर्लची फसवणूक करून ग्राहक पसार झाला होता.

या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक मयूर निकम करीत असताना सदर फरार संशयित हा उपनगर परिसरात आला असल्याची गुप्त बातमी दाराकडून माहिती मिळाली. त्या अनुषंगाने सापळा रचून संशयित यासिम रहमान शेख (वय ३७, रा. प्लॉट नं २५, १० नं. रोड, हक्कानी मजिद, गोवंडी) यास  ताब्यात घेतले. या संशयितांची चौकशी केली असता सदर गुन्ह्याची कबुली दिली.

“यांनी बजाविली कामगिरी “

सदरची कामगीरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, परिमंडळ एकचे पोलीस उपआयुक्त डॉ. किरणकुमार चव्हाण, पंचवटी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रविण चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक निखील बोंडे, गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक प्रविण दाइंगडे, मयुर निकम, पोलिस हवालदार सुरेश नरवडे, देवराम सुरंजे, शिवाजी आव्हाड, ज्ञानेश्वर कहांडळ, निलेश काटकर, दादासाहेब वाघ, पोलिस अंमलदार दिनेश गुंबाडे, सचिन बाहिकर, निखिल वाघचौरे, इरफान शेख, अमोल देशमुख यांनी केली आहे.