कांदा बटाटा उत्पादक संघ अध्यक्षपदी घुगे

कांदा बटाटा संघटना www.pudhari.news

नाशिक : जिल्हा कांदा बटाटा उत्पादक संघाच्या निवडणूकीत अध्यक्षपदी रमेशचंद्र घुगे तर उपाध्यक्षपदी विकास भूजाडे यांची एकमताने निवड झाली. ही निवड संस्थेचे ज्येष्ठ संचालक राजाराम धनवटे, चंद्रकांत कोशीरे, निवृत्ती महाले व इतर संचालक यांच्या उपस्थितीत बिनविरोध झाली. जिल्हा कांदा बटाटा उत्पादक सहकारी संघाच्या १५ जागांसाठी एकूण १०५ अर्ज दाखल झाले होते. निवडणुक निर्णय अधिकारी मनिषा खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली उमेदवारी अर्जांची छाननी झाली. यात संस्था, सोसायटी गटातून सर्वाधिक २७ अर्ज बाद झाले. अवैध अर्ज ठरल्यानंतर रिंगणात ४८ उमेदवारांचे अर्ज शिल्लक होते. गेल्या महिन्यात (दि १८ डिसेंबर) रोजी माघारीच्या अंतिम दिवशी मोठ्या प्रमाणात माघारी होऊन ही निवडणूक बिनविरोध पार पडली होती.

पालकमंत्र्यांचा करिश्मा

निवडणुकीत अप्रत्यक्षरीत्या पालकमंत्री दादा भुसे यांनी आपला करिष्मा दाखवला. भुसे यांचे समर्थक आणि चांदवड तालुक्याचे शिंदे गटाचे तालुकाप्रमुख विकास भुजाडे यांना उपाध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी देखील भुजाडे यांनी दिग्गजांना माघार घेण्यास भाग पाडले होते.

हेही वाचा :

The post कांदा बटाटा उत्पादक संघ अध्यक्षपदी घुगे appeared first on पुढारी.