जळगाव- जिल्हयात एका मागून एक खून होत असताना शहरात कामगाराच्या मानेवर वार करून खून झाल्याची घटना सकाळी उघडकीस आली. याबाबत एम आय डी सी पोलिसांनी 3 संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून यामागे किरकोळ शाब्दिक वादातून हत्या झाल्याचे दिसून आले आहे.
शहरातील नाथ वाडा या ठिकाणी राहणारे ललित प्रल्हाद वाणी हे दि.2 रोजी मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास कामावरून सुप्रीम कंपनीतून दुसरी शिफ्ट ३ ते ११ आटोपून घरी जात असताना. इच्छादेवी चौकात रात्री ११:४० वाजता उतरल्यानंतर तो ५ ते १० मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या नाथवाडा परिसरातील घराकडे पाई निघाला होता. नाथवाडा परिसरात आल्यावर एका बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणाहून तो जात असताना त्याला संशयित आरोपी कमल किशोर बागडे (वय २०, रा. कंजरवाडा, जळगाव) हेमंत उर्फ हुल्या सपकाळे (वय २०, तुकाराम गाडी, जळगाव) व युवराज कैलास पाटील (वय १८, जानकी नगर जळगाव) हे दिसले. संशयित आरोपी व मयत यांच्यामध्ये किरकोळ वाद झाला तिघा संशोधनी त्यांना मारहाण करून एकाने चाकू ने मानेवर वार केला. यानंतर तिथून सर्वजण पसार झाले. सकाळी पाच वाजता नागरिकांना ललित वणीचा मृतदेह दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ या प्रकरणी तपास सुरू केला असता संशयित आरोपी कमल बागडे, हेमंत सपकाळे, युवराज पाटील यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मेघा ललित वाणी (वय ३८) यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, पोलिस उपविभागीय अधिकारी संदीप गावित यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, एपीआय आसाराम मनोरे, पीएसआय रविंद्र चौधरी, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, सचिन पाटील, छगन तायडे, विनोद ऑस्कर, सचिन मुंडे, राजेंद्र कांडेकर, रतीलाल पवार, सिध्देश्वर डापकर यांनी संशयित आरोपींना अटक केली.
हेही वाचा –