गरोदर महिलेस महिला वाहकाकडून अपमानास्पद वागणूक

लासलगाव (जि. नाशिक)- प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या लासलगाव आगाराच्या महिला वाहक आर. ए. दराडे यांनी गरोदर असलेल्या महिलेस उर्मट आणि अपमानास्पद भाषेत वागणूक दिल्याची घटना घडली. या वाहका विरुद्ध यापूर्वीही अनेक वेळा लासलगाव आगार प्रमुख सविता काळे यांच्याकडे तक्रारी आलेले आहेत मात्र आगार प्रमुख यांनीही तोंडी सूचना देऊन तक्रादारांच्या तोंडाला पाणी पुसले आहेत.

लासलगाव आगाराच्या नाशिक वैजापूर या बस मध्ये वैद्यकीय कामकाज आटोपून वैजापूर बस स्थानकात उतरत असताना लासलगाव आगाराच्या महिला वाहक कर्मचारी सौ दराडे यांनी या गर्भवती महिलेस बसमधून खाली उतरताना उशीर झाल्याच्या कारणावरून प्रवाशांसमोर अर्वाच्य भाषेमध्ये वागणूक दिली. बस मध्ये गर्दी असल्याकारणाने आणि संबंधित महिला गर्भवती असल्याने उतरण्यास त्यांना उशीर झालेला होता याबाबत सदर तक्रारदार महिलेने महिला वाहक कर्मचाऱ्यास मी गर्भवती असल्याने मला उतरण्यास उशीर झाला आहे असे सांगितले मात्र या महामंडळाच्या वाहकाने या गर्भवती महिलेस खाजगी गाडीत जाण्याचा त्यांना सल्ला दिला. अशा या उर्मट आणि बेशिस्त वाहकाच्या वागणुकीमुळे लासलगाव आगाराचे नाव खराब होत होत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

विशेष म्हणजे या महिला वाहका विरुद्ध यापूर्वीही अशा अनेक तक्रारी आगार व्यवस्थापिका यांच्याकडे आलेले आहे परंतु संबंधित वाहकाला समज आणि कारवाई करण्यात आली आहे असे प्रशासनाकडून सांगण्यात येते. मात्र या वाहकामध्ये कुठलाही बदल होत असल्याने या आजच्या घटनेवरून लक्षात येते.

मी वैद्यकीय तपासणीसाठी नाशिक येथे आली असताना परतीच्या प्रवासादरम्यान लासलगाव आगाराच्या महिला वाहकाने आमच्याशी उरमट व अपमानास्पद भाषेत वागणूक दिली. या संदर्भात आम्ही विभाग नियंत्रक नाशिक यांच्याकडे तक्रार करणार आहोत.- शबनाज पिरजादे, वैजापूर

या तक्रारीची गंभीर दखल घेऊन संबंधित वाहकावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. – सविता काळे आगार प्रमुख लासलगाव

हेही वाचा –