आमदार सिमा हिरे यांच्या कार्यालयाला ठोकले कुलूप

सिडको : आमदार सिमा हिरे यांच्या संपर्क कार्यालयाला कुलूप लावताना आंदोलनकर्ते

सिडको : पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा बांधव आक्रमक झाला आहे. नाशिकमधील पश्चिम मतदार संघाचे भाजपाचे आमदार सिमा हिरे यांच्या सिडकोतील संपर्क कार्यालयावर सकल मराठा समाजाच्या वतीने मोर्चा काढून कार्यालयासमोर निदर्शने केली. मराठा आरक्षण मिळावे यासाठी आमदार सिमा हिरे यांनी राजीनामा द्यावा या मागणीसह अनेक घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. यानंतर आंदोलनकर्ते यांनी आमदार सिमा हिरे यांच्या कार्यालयाला कुलूप ठोकले. ( Maratha Reservation Protest )

संबंधित बातम्या 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. ‘एक मराठा लाख मराठा’ चा जयघोष करीत मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच आरक्षणासाठी झटणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना पांठिबा मिळावा यासाठी सकल मराठा समाज सिडको विभागाच्या वतीने सोमवारपासून त्रिमुर्ती चौकात साखळी उपोषण सुरू केले होते. याचाच एक भाग म्हणून मंगळवारी (दि.३१) रोजी मराठा समाजाच्या वतीने भाजपा आमदार सीमा हिरे यांनी त्याच्या पदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी त्यांचे सिडको भागातील कार्यालयाला टाळे ठोकत आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यानी आमदार सीमा हिरे राजीनामा अशा घोषणा दिल्या.

यावेळी संजय भामरे, विजय पाटील, योगेश गांगुर्डे, आशिष हिरे, बाळासाहेब गीते, पवन मटाले, सुनील जगताप, प्रीतम भामरे, पंकज पाटील, अक्षय पाटील, संजय जाधव, सागर पाटील, दिनेश नरवडे, ज्ञानेश्वर कोटकर, दीपक चव्हाण, अमित खांडे, शरद भामरे, कैलास खांडगे, पंकज पाटील, ज्ञानेश्वर कोतकर आदीसह सकल मराठा समाजाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

अनुचित प्रकार घडू नये यासाठी अंबड पोलिसांनी सिमा हिरे यांच्या कार्यालयावर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. यावेळी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ( Maratha Reservation Protest )

The post आमदार सिमा हिरे यांच्या कार्यालयाला ठोकले कुलूप appeared first on पुढारी.