नाशिक : सायंकाळी 7 ते 10 वेळेतच फोडा फटाके, मनपाकडून मार्गदर्शक सूचना

फटाके

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; दिवाळीत फटाक्यांमुळे होणारे वायू-ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणावर वायू व ध्वनी प्रदूषण होते. हे प्रदूषण मानवी आरोग्यास हानिकारक आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रदूषण टाळावे. पर्यावरणपूरक फटाके फोडावेत, असे आवाहन डॉ. करंजकर यांनी केले आहे.

फटाके फोडल्याने वायू व ध्वनी प्रदूषण होते. त्यामुळे मानवासच नाही, तर पशुपक्षी व इतर प्राणिमात्रांनाही इजा होऊ शकते. त्यामुळे फटाके फोडताना काळजी घेणे गरजेचे आहे. फटाक्यांसंदर्भात घरातील बड्या मंडळींनी जागृती करावी. लहानग्यांना धोकेदायक फटाके वाजविण्यास देऊ नयेत. वायू व ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न करावेत. फटाके फोडताना शक्यतो सायंकाळी 7 ते 10 या वेळेतच फोडावे. फटाका वाजलेल्या स्थानापासून चार मीटर अंतरापर्यंत १४५ डेसिबल्सच्या ध्वनिपातळीचे उल्लंघन करणारे फटाके निर्मिती, विक्री व वाजविण्यास मनाई आहे, असे महापालिकेच्या पर्यावरण विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : सायंकाळी 7 ते 10 वेळेतच फोडा फटाके, मनपाकडून मार्गदर्शक सूचना appeared first on पुढारी.