गाढ झोपेत असताना घातला घाव, साडूने केली साडूची हत्त्या

murder

सुरगाणा (जि. नाशिक) : प्रतिनिधी

सुरगाणा येथून जवळच असलेल्या सुर्यगड येथील माजी सरपंच मनोहर राऊत (४५) यांची हत्या त्यांच्याच साडूने केल्याची घटना आज पहाटे चार ते पाच वाजेच्या दरम्यान घडली आहे. तर मयत राऊत यांची पत्नी देखील हल्ल्यात गंभीर जखमी झाली असून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. Murder

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी भास्कर पवार आणि मयत माजी सरपंच मनोहर सुरेश राऊत हे सख्खे साडू होते. भास्कर पवार हा तालुक्यातील पळसन जवळील पायरपाडा येथील असून तो पत्नी मंदा पवार व मुलगा सुरेश यांच्यासह मागील पाच सहा महिन्यांपासून सुर्यगड शिवारातील मळ्यात आपल्या साडूकडे रहात होते. आज पहाटे घरात सर्व जण गाढ झोपेत असताना भास्कर पवार याने मोठ्या धारदार कुऱ्हाडाने सख्खा साडू असलेल्या माजी सरपंच मनोहर राऊत यांच्या मानेवर घाव घालून हत्या केली. यानंतर राऊत यांची पत्नी भारती यांच्यावरही त्याने घाव घातला.  हाताच्या दंडावर घाव बसल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.Murder

यावेळी संशयित आरोपी भास्कर याने त्याची पत्नी मंदा पवार हिला देखील मारहाण करुन जखमी केले. यावेळी आरडाओरडा ऐकून मुलगा सुरेश याने धाव घेत वडिल भास्कर यांना पकडून बांधून ठेवले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले. जखमी महिलांना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.Murder

यापैकी मयत मनोहर राऊत यांची पत्नी भारती राऊत यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. यावेळी रूग्णालयात मोठी गर्दी झाली होती. राऊत यांचे पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, वडील असा परिवार आहे. संशयित आरोपी भास्कर पवार यास त्याच्या मुळ गावातून काढून दिले असल्याची चर्चा सुरू होती.

The post गाढ झोपेत असताना घातला घाव, साडूने केली साडूची हत्त्या appeared first on पुढारी.