गुजरातच्या बारडोलीजवळ अपघात, बागलाणचे तीन ठार

बारडोलीजवळ अपघात तीन ठार

सटाणा : पुढारी वृत्तसेवा- गुजरात राज्यातील बारडोली शहराजवळ शुक्रवारी (दि.२४) पहाटेच्या सुमारास मालट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात बागलाण तालुक्यातील खमताणे येथील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण जखमी आहेत.

या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी की, डाळिंब छाटणी करण्यासाठी बागलाण तालुक्यातील खमताणे परिसरातील छाटणी कामगार विरगाव येथील भाजीपाला वाहतूक करणाऱ्या ट्रकवर सुरत येथे निघाले होते. बारडोली जवळ ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी झाला. या अपघातात पिंटू पिराजी पवार (४०), सोनू एकनाथ मोरे (३५), भाऊसाहेब प्रताप बागुल (५०) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये बाबाजी कडू पवार,भाऊसाहेब हिरामण पवार,आकाश माळी,तुळशीराम सोनवणे (रा. तळवाडे),दादा केरसानेकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांना सुरत येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या भीषण अपघाताची माहिती घटनास्थळावर उपस्थित असलेल्या बागलाणमधील एका ट्रक चालकाने आमदार दिलीप बोरसे यांना देत मदतीची मागणी केली. आमदार बोरसे यांनी तात्काळ बारडोली भाजप आमदार ईश्वरभाई परमार यांच्याशी संपर्क साधून बागलाण तालुक्यातील अपघातग्रस्तांना मदत करण्याची विनंती केली. आमदार ईश्वरभाई परमार यांनी तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करून जखमींना सुरत येथील शासकीय रुग्णालयात दाखल केल्याने जखमींवर वेळीच उपचार झाल्याने त्यांचा जीव वाचला आहे.

हेही वाचा –