
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्यानिमित्ताने सराफ बाजाराला झळाळी मिळाली आहे. नाशिकमध्ये सोमवारी (दि. ८) सोन्याच्या २४ कॅरेटचे दर प्रति तोळा ७३ हजार ५०० रुपये होते. तर २२ कॅरेटचे प्रति तोळ्याचे दर ६७ हजार २०० रुपयांवर पोहचले. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बाजारातील दर स्थिर राहण्याचा अंदाज आहे. गेल्या काही दिवसांपासून चांदीतही गुंतवणूक वाढली असून चोख चांदीचे प्रति किलोचे दर ८३ हजार ५०० रुपये नोंदविण्यात आले. सोने व चांदीकडे सध्या सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे साेने-चांदीच्या झळाळीने सराफ बाजार ऊजळून निघाला आहे.
हेही वाचा:
- गुढीपाडव्याच्या शुभेच्छा…! मराठी नववर्षनिमित्ताने शहरात आज निघणार स्वागत यात्रा
- Heat stroke : उष्माघात म्हणजे काय? कसा करावा बचाव?
- Stock Market Updates | शेअर बाजाराने उभारली नव्या विक्रमाची गुढी, सेन्सेक्स प्रथमच ७५ हजार पार, निफ्टी २२,७५० वर
The post गुढीपाडव्यानिमित्ताने सराफ बाजाराला झळाळी; सोने प्रति तोळा ७३ हजार appeared first on पुढारी.