चुंचाळेत मटका अड्ड्यावर छापा, २२ जुगाऱ्यांना पकडले

Police Raid

नाशिक : चुंचाळे शिवारात गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने कारवाई करीत २२ जुगाऱ्यांना पकडले आहे. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, रोकड, मोबाइल व वाहने असा एकूण ४ लाख ८३ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

चुंचाळे येथील दत्तनगर परिसरात विशेष पथकाने मंगळवारी (दि.६) सायंकाळी छापा टाकला. पत्र्याच्या शेडमध्ये संशयित शाम वाघमारे (५०, रा. मोरवाडी) व इतर २१ संशयित जुगार खेळताना व खेळवताना आढळून आले. त्यामुळे त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रविण सुर्यवंशी, हेमंत नागरे, किरण रोंदळे, हेमंत फड, उपनिरीक्षक दिलीप भोई, सहायक उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, हवालदार किशाेर रोकडे, नाइक योगेश चव्हाण, भुषण सोनवणे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा :

The post चुंचाळेत मटका अड्ड्यावर छापा, २२ जुगाऱ्यांना पकडले appeared first on पुढारी.