छगन भुजबळांकडून तुतारी’चा प्रचार, सुहास कांदे यांचा गंभीर आरोप

पुढारी ऑनलाइन डेस्क – नाशिक जिल्ह्याला राष्ट्रवादीचे छगन भुजबळ व शिवसेनेचे सुहास कांदे यांच्यातील वाद काही नवीन नाही. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर तेही महायुतीत सोबत असताना कांदे यांनी भुजबळांवर केलेल्या आरोपांमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

महायुतीचे नेते छगन भुजबळ  हे शरद पवार गटाच्या तुतारी या निवडणूक चिन्हाचा प्रचार करत असल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. कांदे यांच्या या आरोपांमुळे नाशिकच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

भुजबळांचे कार्यकर्ते दिंडोरीत भास्कर भगरे यांच्या सोबत फिरतात असा आरोप करत तुम्हाला तुतारीचा एवढा पुळका असेल तर तुम्ही मंत्रीपदाचा राजीनामा द्या आणि खुशाल तुतारीचे काम करा अशी टीका कांदे यांनी भुजबळांवर केली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यात कांदे यांनी भुजबळांवर हा हल्लाबोल केला आहे.

छगन भुजबळ यांनी कांदे यांचे आरोप फेटाळले असून  आमदार काहीही बोलत असले तरी कार्यकर्त्यांनी मात्र महायुतीचा प्रचार करावा असे भुजबळ यांनी म्हटले आहे. सुहास कांदे यांच्या या आरोपांमुळे महायुतीतील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा –