छगन भुजबळ आजूनही नाराज? गिरीश महाजन यांनी स्पष्टच सांगितलं

छगन भुजबळ, गिरीश महाजन

नाशिक पुढारी वृत्तसेवा- नाशिकच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा छगन भुजबळ हे नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे. जयंत पाटील यांनी भुजबळ नाराज असल्याचे विधान केल्यानंतर भाजपचे संकटमोचक असलेले गिरीश महाजन नाशिकला असल्याने तत्काळ भुजबळ फार्मला हजेरी लावत भुजबळांची भेट घेतली.

दोन दिवसांनी मतदान आहे, त्याच संदर्भात भुजबळांशी चर्चा झाल्याचे भेटीनंतर माध्यमांशी बोलताना महाजन यांनी सांगितले. दरम्यान भुजबळ हे आजूनही नाराज आहेत यासंदर्भात महाजनांना विचारले असता तसे काहीही नसल्याचे महाजनांनी स्पष्ट केलं आहे.

काय म्हणाले महाजन?

  •  भुजबळांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत जोरदार भाषण केलं.
  • मोदींना का पंतप्रधान करायचे आहे, हे त्यांनी अतिशय समर्पक शब्दांत भाषणात मांडले आहे.
  • त्यामुळे भुजबळ नाराज असल्याचे पसरविण्याच्या चर्चा निर्रथक असल्याचे महाजनांनी सांगितले आहे.

अनिल देशमुख तरी तिथे स्थिरस्थावर आहेत का?

यावेळी बोलताना महाजन यांनी, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यानी शरद पवार यांची मध्यरात्री भेट घेतल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले होते. जे सोडून गेले त्यांना परत घेणार नाही, असेही त्यांनी म्हटले. त्यावर बोलताना महाजन यांनी देशमुखांनी तटकरेंची चिंता सोडून द्यावी. यावर गिरीश महाजन म्हणाले की, अनिल देशमुख तरी तिथे स्थिरस्थावर आहेत का? तुम्ही तिकडे राहा नाहीतर अजून काही वेगळे विचार तुमच्या मनात येतील. सुनील तटकरेंची चिंता तुम्ही करू नका, असा टोला त्यांनी यावेळी अनिल देशमुखांना लगावला.

भुजब‌ळांनी देखिल याबाबत सांगत तटकरे यांनी माझं कोणाचं बोलणं झाले नाही असे सांगितले आहे. त्यामुळे देशमुख, तुम्ही तुमचं सांभाळा. तुमचे लोक इकडे येणार नाही ते पाहा. त्यांच्यासाठी डिपार्टमेंट राखून ठेवले आहेत, असा टोला भुजबळांनी अनिल देशमुखांना लगावला आहे.

गडकरींच्या सभेला भुजबळही राहणार उपस्थित

भाजपचे जेष्ठ नेते नितीन गडकरी यांची आज प्रचारार्थ गोदाघाटावर सभा होणार आहे. या सभेला भुजबळ उपस्थित राहणार आहेत. शेवटचा टप्पा असल्याने मुंबईत सभा आहे. त्यासाठी राज ठाकरे हे देखील असतील.

हेही वाचा –