जमीनीच्या आमिषापोटी बांधकाम व्यावसायिकाकडून एकाची फसवणूक

CRIME NEWS

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जमीन विकसित करून देण्याच्या बहाण्याने एका बांधकाम व्यवसायिकाने जागा मालकास २८ कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात बांधकाम व्यावसायिक विजय राठी व इतर आठ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्थिक गुन्हे शाखा या गुन्ह्याचा तपास करत आहे. संशयितांमध्ये काही महिलांचाही समावेश आहे. गोळे कॉलनी परिसरातील एक हेक्टर ५४ आर जमीन विकसित करून देण्याच्या बहाण्याने संशयितांनी कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. विजय बेडमुथा (वय ५९, नाशिकरोड) यांच्या फिर्यादीनुसार, राठी व इतर संशयितांनी नोव्हेंबर २००८ पासून प्लॉट विकसित करून देण्याचे आमिष दाखवले. यासाठी संशयितांनी ॲग्रीमेंट केले व बेदमूथा यांच्याकडून २८ कोटी १० लाख रुपये वेळोवेळी घेतले. मात्र ठरल्याप्रमाणे संशयितांनी बेदमूथा यांना प्लॉट विकसित करून दिलाच नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर बेदमूथा यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली. प्राथमिक तपास करीत पोलिसांनी एकूण ९ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तर विजय जगन्नाथ राठी, कौसल्या जगन्नाथ राठी, सुजाता मंत्री, अर्चना मालानी, श्रुती लड्डा, अदिती अग्रवाल.दिपक राठी, वृंदा राठी,सी. सुशमा काबरा अशी संशयिताची नावे आहेत.

हेही वाचा:

The post जमीनीच्या आमिषापोटी बांधकाम व्यावसायिकाकडून एकाची फसवणूक appeared first on पुढारी.