नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी मराठा समाजाकडून नाशिक शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. दरम्यान भुजबळ यांच्याबाबत बोलतांना ते म्हणाले की, छगन भुजबळ मग्रुर असून …. त्यांच्या अंगात मस्ती आहे. त्यामुळे ओबीसी समाजाने भुजबळ यांना समज द्यावी. छगन भुजबळ यांनी गाेरगरीब अशा नाभिक समाजाचा अपमान केला आहे. त्यांनी माफी मागावी. असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
10 तारखेच्या आमरण उपोषणाची घोषणा केल्यानंतर मंगळवारी-बुधवारी होणारी कॅबिनेट नुकतीच सोमवारी झाली. त्यांनी निर्णय घेतला, अशी माहिती ऐकायला आली आहे. राजपात्रित अधिसूचना काढली असली तरी येत्या विशेष अधिवेशनात अध्यादेशाच कायद्यात रुपांतर करुन तातडीने अमलबजावणी करावी म्हणून उपोषणाला बसणार आहे असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
तसेच राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्याबाबत झालेल्या भाषणाबाबत “आता मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसण्याची वेळ का आली?” अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. त्यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “राज ठाकरे यांच्या पाठिशी मराठा समाजाची तरुणाई आहे. नाशिकच पाणीच तसं आहे. ते तेवढ्यापुरता बोलले असतील, मण आता लवकरच त्यांची भूमिका बदलेल” असे जरांगे यावेळी म्हणाले.
The post जरांगेंचा निशाणा; माफी मागत नाहीत म्हणजे भुजबळ मग्रुर appeared first on पुढारी.