जळगाव जिल्ह्याने पहिल्यांदा ओलांडली मतदानाची ‘साठी”

मतदान

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – जळगाव जिल्ह्यातील लोकसभेच्या रावेर व जळगाव मतदारसंघात दि. 13 मे रोजी मतदान झाले. यावेळी प्रथमच जळगाव जिल्ह्याने मतदानाचा 60 टक्केचा आकडा पार केला आहे. यात जळगाव लोकसभेमध्ये 58.48 टक्के मतदान झाले आहे. रावेर लोकसभेमध्ये 64.28 टक्के मतदान झालेले आहे. (Lok Sabha Election 2024)

जळगाव जिल्ह्यातील जळगाव लोकसभा व रावेर लोकसभेच्या मतदानात प्रथमच जिल्ह्यात 60 टक्केचे पुढे मतदान झाले आहे. जिल्ह्यात एक लाख तीन हजार मतदार वाढलेले आहेत. जळगाव लोकसभेमध्ये 58. 48 टक्के मतदान झाले आहे. यात जळगाव सिटी 53.55, जळगाव ग्रामीण 62.64, अमळनेर 55.7, एरंडोल 61.8, चाळीसगाव 58.46, पाचोरा 66.6 मतदान झाले आहे. (Lok Sabha Election 2024)

तर 2019 च्या निवडणुकीपेक्षा 2024 मध्ये जळगाव सिटी 4.41, जळगाव ग्रामीण 2.19 ,अमळनेर 2.20, एरंडोल 2.42, चाळीसगाव 0.25, पाचोरा 2.23 टक्क्याने वाढ झालेली असून जळगाव लोकसभेमध्ये 2.32 टक्के मतदान वाढले आहे. रावेर लोकसभेमध्ये 64.28 टक्के मतदान झाले असून चोपडा 62 25,रावेर 70.81, भुसावळ 57.38, जामनेर 63.33, मुक्ताईनगर 64.87, मलकापूर 67.38 टक्के मतदान झाले आहे. तर 2019 च्या निवडणुकीपेक्षा 2024 मध्ये चोपडा 1.03, रावेर 4.99, भुसावळ 4.99,जामनेर 3.29, मुक्ताईनगर 2.19, मलकापूर 0.37 टक्क्याने वाढ झालेली असून जळगाव लोकसभेमध्ये 2.88 टक्के मतदान वाढलेले आहे.

हेही वाचा –