
जळगाव : पुढारी वृत्तसेवा
नादुरुस्त अवस्थेत उभ्या असलेल्या ट्रकमधून लाखो रुपयांचे शेंगदाणा कट्टे चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. चाळीसगाव- मेहूणबारे रस्त्यावरील एका पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली असून याप्रकरणी चाळीसगाव पोलिसात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, चाळीसगाव – मेहूणबारे रस्त्यावरील नायरा पेट्रोल पंपाजवळ ट्रक (क्रमांक एम.एच.१८ ए.ए. ०९६३) हा नादुरुस्त झाल्याने उभा होता. त्यात ५ लाख १८ हजार सातशे रूपयांचा शेंगदाणा कट्टे होते. एकूण ९१ कट्टात शेंगदाणे भरलेले होते. नेमक्या याच संधीचा फायदा घेत, संशयित अज्ञातांनी ट्रकच्या मागच्या बाजूला असलेली दोरी तोडून व ताडपत्री फाडून वरील लाखो रुपयांचे शेंगदाणे चोरी केले. याप्रकरणी रविंद्र जगन्नाथ जाधव (रा. धुळे) यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात संशयित अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोलीस हवालदार दत्तात्रय महाजन हे करीत आहे.
हेही वाचा:
- Share Market Closing Bell | सेन्सेक्स ६२ हजारांवर बंद, ‘या’ शेअर्सची दमदार कामगिरी
- तळेगाव दाभाडे : जलशुद्धीकरण केंद्राला मुख्याधिकार्यांची भेट
- नाशिक : एसव्हीकेटीच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमात कलागुणांचा अविष्कार
The post जळगाव : ट्रकमधून पाच लाखांच्या शेंगदाण्यांचे कट्टे लंपास, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल appeared first on पुढारी.