जालना लाठीचार्जचे नाशिकमध्ये पडसाद

मराठा आंदोलन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जालना येथील घटनेचे पडसाद आज नाशिकमध्ये उमटले. जिल्ह्यातील मराठा संघटना आक्रमक झाल्या. संंभाजी ब्रिगेड आणि स्वराज्य संघटेनच्या कार्यकर्त्यांनी शनिवार (दि. २) सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात आंदोलन करत घटनेच्या सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनी आंदोलनाला चुकीचे वळण मि‌‌ळू नये यासाठी काही कार्यकर्त्यांना ताब्यात देखिल घेतले होते.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावामध्ये मराठा बांधवांकडून उपोषण सुरु होते. मात्र आंदोलकांना उपोषणासाठी विरोध करत पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. यानंतर आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलकांवरील लाठीमारानंतर राज्यभरातून त्यावर प्रतिक्रिया होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आंदोलन करण्यात आले. नाशिकमध्ये देखील स्वराज्य संघटनेसह अनेक मराठा संघटना आक्रमक झाल्या होत्या.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आंदोलन

दरम्यान, आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर बसून जालना येथील घटनेचा निषेध व्यक्त केला.

टायर जाळण्याचा प्रयत्न

स्वराज्य पक्ष तसेच संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मेहेर सिग्नलवर आंदोलन केले. यावेळी सरकारच्या विरुद्ध घोषणाबाजी करतानाच काही कार्यकर्त्यांनी टायर जाळण्याचा प्रयत्न केला. वेळीच पोलिसांच्या लक्षात आल्याने त्यांनी संबंधित टायर आणि इतर वस्तू ताब्यात घेतल्या.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे पोस्टर फाडले

आंदोलनाच्या दरम्यान आंदोलकांनी निषेध व्यक्त करतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फ़डणवीस यांची छायाचित्रे असलेली पोस्टर फाडले.

हेही वाचा :

The post जालना लाठीचार्जचे नाशिकमध्ये पडसाद appeared first on पुढारी.