जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करून अटक करा

नाशिक साधू,www.pudhari.news

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा; राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) शिर्डीमध्ये सुरू असलेल्या शिबिरात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने राज्यभरात निदर्शने केली जात आहे. त्याप्रमाणे नाशिकमध्ये देखील संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून साधू- महंतांनी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. याबाबत हिंदुत्ववादी संघटनांच्या शिष्टमंडळाने पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांची भेट तक्रार देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

तक्रारती म्हटले की, नेमहीच हिंदू देवदेवतांवर खालच्या पातळीची वक्तव्य केले जातात. यासाठी सरकारने ‘इशनिंदा’ कायदा लागू करावा अशी मागणीही केली आहे. आ. आव्हाड यांनी श्रीराम त्यांच्या १४ वर्षांच्या वनवास काळात मांस भक्षण करीत होते असा वक्तव्य केले होते. यामुळे हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्या असून, श्रीराम बहुजनांचा असल्याचे सांगून जाती जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. तसेच आव्हाड यांना तात्काळ अटक करावे अशी मागणी केली. यावेळी काळाराम मंदिराचे महंत सुधीरदास पुजारी, प्राचीन पंचमुखी हनुमान मंदिराचे महंत भक्तीचरण दास महाराज, महर्षी पंचायतम सिद्धपिठाचे डॉ. अनिकेतशास्त्री, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष विराज लोमटे, हिंदू एकता आंदोलन पक्षाचे रामसिंग बावरी, भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेश चिटणीस माधुरी पालवे आदी उपस्थित होते.

नाशिकमधील साधू, महंतांनी जितेंद्र आव्हाड यांचा निषेध केला आहे. पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार सादर करून आव्हाड यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. – भक्तीचरणदास महाराज, श्री महंत, दिगंबर आखाडा.

आव्हाड यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी आहे. ॲड. अविनाश भिडे यांच्याद्वारे न्यायालयात गुन्हा दाखल केला जाणार आहे. वारंवार हिंदू देव देवतांवर टीका टिप्पणी केली जात आहे. पंतप्रधान नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांच्याकडे ‘इशनिंदा’ कायदा लागू करण्याची मागणी करण्यात आहेत. – महंत सुधीरदास पुजारी, काळाराम मंदिर संस्थान, पंचवटी

हेही वाचा :

The post जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करून अटक करा appeared first on पुढारी.