नाशिक : पुढारी वृत्तसेवा- कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्याबरोबरच पोलीस प्रशासनावर नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. पोलिसांच्या कामात नवीन वाहनांमुळे वेग येणार असून आगामी काळात पोलिसांनी कर्तव्याप्रती अधिक दक्ष राहण्याचे अवाहन प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) नाशिक कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्राप्त 20 नवीन बोलेरो वाहनांचे लोकार्पण पालकमंत्री दादाभुसे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार हेमंत गोडसे, विशेष पोलीस महानिरिक्षक नाशिक दत्तात्रय कराळे, जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) विक्रम देशमाने यांच्यासह पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मंत्री भुसे म्हणाले, गुन्हेगारीला आळा घालण्याची व नागरिकांच्या सुरेक्षेची पोलीस प्रशासनावर महत्वाची जबाबदारी असते. यादृष्टीने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून एकूण 71 चारचाकी व दुचाकी वाहनांच्या खरेदीसाठी 3 कोटी 9 लाख 72 हजार 830 रूपयांचा निधीस मंजूरी देण्यात आली आहे. त्यापैकी प्राप्त झालेल्या 20 नवीन बोलेरो वाहनांच्या माध्यमातून गुन्ह्याच्या ठिकाणी तातडीने व जलदपणे पोहचणे शक्य होणार आहे. नवीन वाहनांमुळे ग्रामीण पोलीस अधिक सक्षमतेने काम करू शकतील असा विश्वास भुसे यांनी व्यक्त केला. यावेळी भुसे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला अधिकारी व कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा :
- Dates : सौदी अरेबियातील खजूर सर्वोत्तम!
- एक ठराव असाही : मुलीचा विवाह पदवीधर झाल्यानंतरच
- Dates : सौदी अरेबियातील खजूर सर्वोत्तम!
The post जिल्हा ग्रामीण पोलीस दलाच्या ताफ्यात 20 नवीन वाहने appeared first on पुढारी.