जिल्ह्यात ६९ आंदाेलकांना ठेवले होते रोखून

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त खबरदारी म्हणून शहर व ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातील ६९ आंदोलकांना रोखून ठेवले होते. त्यामुळे मोदी यांच्या दौऱ्यात कुठेही निषेध किंवा आंदोलन झाले नाही. त्याचप्रमाणे खबरदारी म्हणून ४६ जणांना सीआरपीसी १४९ प्रमाणे नोटिसा बजावल्या. कांदा निर्यातबंदीसह इतर प्रश्नांसाठी शहर व जिल्ह्यातील विविध संघटना, नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.

त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पाेलिसांनी सुरुवातीस आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यात केंद्र व राज्य शासनाविरोधात आंदोलन केलेल्यांसह शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचीही समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे शहरातील २१ व ग्रामीण भागातील २५ आंदोलकांना नोटिसा बजावल्या होत्या, तर शहरातील ३६ व ग्रामीण भागातील ३३ आंदोलकांना पाेलिसांनी ताब्यात घेत त्यांना आंदोलन, निषेध नोंदवण्यापासून रोखले. ताब्यात घेतलेल्यांना दुपारी 3 नंतर पुन्हा सोडण्यात आले. या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे कुठेही व्यत्यय आला नाही.

हेही वाचा :

The post जिल्ह्यात ६९ आंदाेलकांना ठेवले होते रोखून appeared first on पुढारी.