नाशिक (सुरगाणा) : पुढारी वृत्तसेवा
दिंडोरी लोकसभा मतदार संघातील लढाऊ शेतकरी नेते तथा माजी आमदार जे. पी. गावीत यांच्यावर विश्वास असलेले सर्वसामान्य शेतकरी, बागायत शेतकरी, आदिवासी, कष्टकरी कामगार, शेतमजूर आणि नोकरदार वर्ग यांच्या आग्रहाखातर दिंडोरी लोकसभा निवडणुकीत जे. पी. गावीत यांनी उमेदवारी अर्ज भरायलाच हवा, यासाठी तळागाळातून जोरदार पाठिंबा व समर्थन दिले जात आहे.
इंडिया आघाडीतील सहभागी पक्षांनी माकप साठी सुरक्षित आणि विजय मिळवून देणारी दिंडोरीची जागा सोडली नाही, माकपच्या केंद्रीय कमिटीने जागावाटप बाबत दिंडोरिकडे दुर्लक्ष केले असून पक्षाचे संघटन वाढविणाऱ्या महाराष्ट्र राज्य आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लढवय्या योद्धे जे. पी. गावीत यांच्यावर अन्याय्य केला असल्याने कार्यकर्ते व मतदार यांच्यात कमालीची नाराजी पसरली आहे. तालुका आणि गाव पातळीवर काम करणारे कार्यकर्ते आणि मतदार संघातील शेकडो शिष्टमंडळे दररोज गावीत यांना भेटून उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी आर्जव करत आहेत. पक्षाच्या वरिष्ठांनी याबाबत योग्य निर्णय घेऊन उमेदवारी गावीत यांनाच द्यावी, असे येथील कार्यकर्ते व नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. पक्षाने योग्य निर्णय न घेतल्यास अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी गावित यांना पाठींबा देण्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे. डॉ. भारती पवार यांच्यावर मतदार संघात प्रचंड रोष आहे, कोणतेही राजकीय कार्य नसलेला उमेदवार राष्ट्रवादीने दिल्याने नागरिक संतप्त आहेत, या मतदार संघात गोर गरीब आदिवासी शेतकरी बांधवांना न्याय्य देणारा एकमेव लढाऊ नेता जे. पी. गावित हे आहे. त्यामुळें येथे भाजपा आणि राष्ट्रवादी (तुतारी) चालणार नाही. ही भूमिका मतदार बोलून दाखवत आहेत. येणाऱ्या काळात मतदार संघातील कार्यकर्ते आणि स्वतः गावीत यांनी निर्णायक भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे मतदार संघात मतांची बंद पेटी असलेले जे. पी. गावीत एक नवीन ट्विस्ट आणतात का. याकडे मतदार संघ व नाशिक जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा:
- Weather Update : शहराला ‘रविवार’चा सर्वाधिक ताप! चिंचवडचा पारा 41 वर
- कोल्हापूर जिल्ह्यात होणार 210 कि.मी.चे काँक्रिट रस्ते
- मद्यधोरण गैरव्यवहार केजरीवाल यांच्या अंगलट
The post जे.पी. गावित यांनी अपक्ष लढण्यासाठी कष्टकऱ्यांकडून आग्रह appeared first on पुढारी.