ज्येष्ठ साहित्यिक मनोहर शहाणे यांचे निधन

मनोहर शहाणे निधन

नाशिक : पुढारी वृत्तसेवाज्येष्ठ साहित्यिक, कथाकार, कादंबरीकार, पत्रकार त्याचबरोबर मराठी साहित्यात विपुल लेखन करणारे मनोहर शहाणे (९६) यांचे निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या पश्च्यात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे.

नाशिककर असणारे शहाणे यांचा जन्म १ मे १९३० रोजी झाला. त्यांचे वडील सराफी व्यवसायिक होते. मात्र बालपणीच त्यांच्या पित्याचे छत्र हरपल्यानंतर त्यांच्या आजी व आईने अतिशय गरीब परिस्थितीत त्यांना लहानाचे मोठे केले. शालेय जीवनापासूनच त्यांना साहित्य, लिखाणाची आवड होती. शाळेत असताना त्यांनी क्रांती नावाची नाटिका लिहिली होती. त्यानंतर मराठी साहित्यात त्यांनी विपुल लेखन केले. विशेषतः कादंबरी, कथा लेखनात ते रमले. त्यांच्या इहयात्रा, उलुक, झाकोळ या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. मराठी भाषेतील गाजलेले अमृत या नियतकालिकाचे संपादक पद त्यांनी भूषविले. साहित्य समृद्ध करण्यात मोलाची भूमिका बजावलेल्या मनोहर शहाणे यांच्या निधनाबद्दल सर्वत्र शोकभावना व्यक्त होत आहेत.

हेही वाचा :

The post ज्येष्ठ साहित्यिक मनोहर शहाणे यांचे निधन appeared first on पुढारी.