मकरंदवाडी येथे गुरुवार पासून धर्मनाथ बीज महोत्सव

धर्मनाथ बीज महोत्सव www.pudhari.news

देवळा  : पुढारी वृत्तसेवा ;  मकरंदवाडी ता. देवळा येथील श्रीक्षेत्र गोरक्षनाथ मळ्यात ८ ते १२ फेब्रुवारी दरम्यान  भव्य धर्मनाथ बीज महोत्सव आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती संस्थानचे संचालक व कीर्तन केसरी  संजय धोंडगे यांनी दिली.

या निमित्ताने हरिपाठ, कीर्तन सोहळा, बीजउत्सव आदी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. बीजउत्सवाचे हे ३० वे वर्ष असून त्या निमित्ताने राज्यातील प्रसिध्द कीर्तनकार आपली सेवा रुजू करणार आहेत. त्यात ८ फेब्रुवारी रोजी चंद्रशेखर महाराज देगलूरकर, ९ फेब्रुवारी रोजी – श्रीउद्धव महाराज मंडलिक नेवासा, १० फेब्रुवारी  रोजी – श्रीविश्वनाथ महाराज वारिंगे मुंबई, ११ फेब्रुवारी रोजी – श्रीकान्होबा महाराज देहूकर यांची कीर्तने होणार असून १२ फेब्रुवारी  रोजी  ह भ प  संजय महाराज धोंडगे यांच्या काल्याच्या किर्तनाने या उत्सवाची सांगता होणार आहे. दरम्यान ११ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १२ दरम्यान धर्मनाथ बीज उत्सवानिमित्त आचार्य तुषार भोसले यांच्या हस्ते महाआरती होणार आहे. या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा :

The post मकरंदवाडी येथे गुरुवार पासून धर्मनाथ बीज महोत्सव appeared first on पुढारी.