देवळा अभिनव बालविकासची तृप्ती निकम प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम

देवळा : पुढारी वृत्तसेवा; येथील अभिनव बालविकास मंदिर व जनता विद्यालयाची विद्यार्थीनी तृप्ती सोमनाथ निकम हिने महात्मा फुले विचार जागर मंचतर्फे आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे रोख एक लाख रुपयांचे पारितोषिक मिळवले. या विचार मंचाकडून तिला या रकमेचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

थोर समाजसुधारक महात्मा फुले यांच्या कार्याची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी १०० गुणांची परीक्षा घेण्यात आली होती. त्यात ९० प्रश्न वस्तुनिष्ठ तर १० गुणांसाठी मोठ्या उत्तरांचे प्रश्न यांचा समावेश होता. या परीक्षेत विशेष गुण मिळवत तृप्ती प्रथम आल्याने तिला एक लाख रुपयांचा धनादेश रविवार (दि .४) रोजी या विचार मंचाच्या वतीने प्रदान करण्यात आला. माध्यमिक शिक्षक सोमनाथ निकम यांची ती कन्या आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल तिचे मविप्रचे संचालक विजय पगार, मुख्याध्यापक मनीष बोरसे यांच्यासह इतर सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.

हेही वाचा

The post देवळा अभिनव बालविकासची तृप्ती निकम प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम appeared first on पुढारी.