निफाड(जि. नाशिक) : प्रतिनिधी- कौटुंबिक कारणावरुन पत्नीसोबत वाद घालून तिची झोपेतच कुऱ्हाडीने हत्या केल्याप्रकरणात श्रावण किसन गायकवाड (३७, रा. रौळस) यास दोषी ठरवत निफाडचे जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. व्ही. गुजराथी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
काय घडलं?
- घरगुती कारणावरुन पत्नीसोबत भांडण झालं.
- रात्री पत्नी झोपी गेल्यावर पतीने कुऱ्हाडीने तीची हत्या केली.
- पत्नीची हत्या करुन पती फरार झाला होता.
दारु पिण्याचे होते व्यसन
तालुक्यातील रौळस येथे श्रावण गायकवाड हा पत्नी सिमा व दोन मुले हर्षद (१०) व जयेश (७) समवेत राहत होता. त्याला दारु पिण्याचे व्यसन होते. ३० मार्च २०१९ रोजी रात्री ११ ते २ च्या दरम्यान पती-पत्नीमध्ये घरगुती कारणावरुन वाद झाला. पत्नी झोपी गेल्यावर त्याने तिच्या डोक्यात कुऱ्हाड मारुन खुन केला. त्यानंतर तो फरार झाला होता. याबाबत मयत सिमा हिचे बंधु भारत गायकवाड यांनी निफाड पोलिस स्टेशनला फिर्याद नोंदविली. पोलिसांनी भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंदवून श्रावणला अटक केली.
नऊ साक्षीदारांची साक्ष
तपास अधिकारी विष्णु गायकवाड यांनी तपास करुन आरोपपत्र निफाड न्यायालयात दाखल केले. सरकार पक्षातर्फे सहाय्यक जिल्हा सरकारी वकिल अॅड. रमेश कापसे यांनी नऊ साक्षीदारांची साक्ष नोंदविली. साक्षी पुराव्यावरुन आरोपी श्रावण यास दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा तसेच दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दहा वर्ष कारावास अशी शिक्षा सत्र न्यायाधीश गुजराथी यांनी सुनावली आहे.
हेही वाचा –