तिघे पोहत पाण्याबाहेर आले, अमोल मात्र बेपत्ता झाला; चांदशी पुलाजवळील घटना

युवकाचा बुडून मृत्यू

नाशिक : चांदशी पुलाजवळ अंघोळीसाठी गेलेल्या १८ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अमोल दादासाहेब वाघ (१८, रा. आनंदवली) असे या युवकाचे नाव आहे. अमोल हा त्याच्या चार मित्रांसह गुरुवारी (दि. ७) दुपारी नदीपात्रात अंघोळ करीत होते. त्यापैकी तिघे पोहत पाण्याबाहेर आले. मात्र, अमोल पाण्यात बेपत्ता झाला. अग्निशमन दलाच्या मदतीने अमोलचा शोध सुरू झाला. दरम्यान, शुक्रवारी (दि. ८) सायंकाळी ४.३० च्या सुमारास अमोलचा मृतदेह तरंगताना आढळून आला. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

उंचावरून पडल्याने तरुणाचा मृत्यू

नाशिक : पाण्याच्या टाकीवरून खाली पडल्याने सदाशिव सीताराम वाघमारे (३५, रा. छत्रपती संभाजीनगर रोड) यांचा मृत्यू झाला. सदाशिव हे गुरुवारी (दि. ७) इमारतीच्या पाण्याच्या टाकीवर चढले होते. मात्र, पाय घसरल्याने ते खाली पडले. त्यात गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

The post तिघे पोहत पाण्याबाहेर आले, अमोल मात्र बेपत्ता झाला; चांदशी पुलाजवळील घटना appeared first on पुढारी.