त्र्यंबक रोडवर दुचाकी घसरून युवक ठार

ACCIDENT pudhari.news

नाशिक : दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना त्र्यंबक रोडवर घडली. या अपघातात सौरभ हंसराज गुप्ता (२६, रा. राजीवनगर) याचा मृत्यू झाला. तर दुचाकीचालक रवि सुभाष दानोदिया (२७, रा. राजीवनगर) हा गंभीर जखमी झाला. अज्ञात वाहनचालकाने शनिवारी (दि. १३) सकाळी भरधाव वाहन चालवून सौरभ व रवि यांच्या दुचाकीस कट दिला. त्यामुळे त्यांची दुचाकी घसरून अपघात झाला. यात सौरभचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजीवनगरला घरफोडीत दागिने लंपास

नाशिक : राजीवनगर येथील अश्वमेध कॉलनीत चाेरट्याने १३ ते १४ एप्रिलदरम्यान, घरफोडी करून सुमारे ७८ हजार रुपयांचे साेने-चांदीचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी शुभम पगारे (२७) यांनी इंदिरानगर पोलिस ठाण्यात घरफोडीची फिर्याद दाखल केली आहे.

उधारीत शर्ट न दिल्याने मारहाण

नाशिक : उधारीवर शर्ट दिला नाही याची कुरापत काढून एकाने दुकानचालकास मारहाण करीत दमदाटी केल्याचा प्रकार शिवाजीनगर परिसरात घडला. अमन सूर्यवंशी (२७, रा. श्रमिकनगर, सातपूर) याच्या फिर्यादीनुसार, संशयित मयूर पौळकर (रा. शिवाजीनगर) याने शनिवारी (दि. १३) दुपारी अडीच वाजता महाकाल फॅशन हब दुकानात शिवीगाळ, दमदाटी करीत मारहाण केली. तसेच काेयत्याचा धाक दाखवला. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

The post त्र्यंबक रोडवर दुचाकी घसरून युवक ठार appeared first on पुढारी.