थरारक ! नाशिकमध्ये भर रस्त्यात उत्तर महाराष्ट्र केसरीची हत्या

पुढारी ऑनलाइन डेस्क – नाशिक मुंबई महामार्गावर करिश्या ढाब्याजवळ उत्तर महाराष्ट्र केसरी विजेता भूषण लहामगे याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. गाडीतून आलेल्या तिघांनी धारदार शस्राने वार करुन, भूषण वर  गोळ्या झाडून त्याची हत्या केली आहे. लोकसभा निवडणुकीचा माहोल असताना घडलेल्या या घटनेने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.

दरम्यान, पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. हत्या करुन आरोपी पसार झाले असून पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती आहे.