दिंडोरीत अनैतिक संबंधातून युवकाचा खून? घरापासून 100 मीटरवर विहिरीत आढळला मृतदेह

मृतदेह आढळला,www.pudhari.news

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा– तालुक्यातील तिल्लोळी येथे एका ३५ वर्षीय युवकाचा खून करुन पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत टाकून दिल्याचा प्रकार गुरुवारी (दि.९) उघडकीस आला.

तिल्लोळी येथील अनिल पोपट गायकवाड (३५) याचा घरापासून १०० मीटर अंतरावरील एका विहिरीत मृतदेह आढळला. दिंडोरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला. पंचनामा केला असता मृताच्या डोक्यावर व हाताच्या पंजावर गंभीर जखमा दिसून आल्यात. हत्याराने वार झाल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त होत आहे. त्यादिशेने तपासाची चक्रे फिरवली जात असताना, मयताचा भाऊ नाना गायकवाड (रा. दुगाव) याने फिर्याद नोंदवली. त्यात, अनिल याचे रवळगाव येथील एका महिलेशी अनैतिक प्रेम संबंध होते. त्यातूनच तिच्या भावाने खून केला असावा, अशा संशय वर्तविला आहे. त्यानुसार संशयित सागर टोंगारे यासह एका अज्ञाताविराेधात खूनाचा गुन्हा नोंदविला आहे. संशययितास ताब्यात घेतले असून, पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुदर्शन आवारे हे अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा –