दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादी करणार संयुक्त प्रचार दौरा, ठाकरे गटही लावणार ताकद पणाला

दिंडोरी www.pudhari.news

जानोरी पुढारी वृत्तसेवा – दिंडोरी लोकसभा मतदासंघात निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची संयुक्त बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, निरीक्षक सुनील भुसरा, शिवसेनेचे संपर्कप्रमुख जयंत दिंडे यांच्या उपस्थितीत झाली. एकसंघ पणे नियोजनबध्द प्रचार यंत्रणा राबवत दिंडोरीची जागा जिंकण्याचा निश्चय या बैठकीत करण्यात आला.

यावेळी बोलताना, पूर्वीचा मालेगाव व नंतरच्या दिंडोरी लोकसभा निवडणुकीत भाजपची कोणतीही ताकत नसताना शिवसेनेने युती धर्म पाळत शिववसैनिकांनी जीवाचे रान करत भाजपचे खासदार केले. गेल्यावेळी शिवसेनेचे धनराज महाले यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी केली. तरी शिवसैनिकांनी भाजपचे प्रामाणिक काम केले मात्र पुढे खासदारांनी शिवसैनिकांशी कधीही संपर्क केला नाही तसेच भाजपने शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी फोडण्याचे पाप केले हे जनतेला अजिबात मान्य नसून सर्व जनता या निवडणुकीत भाजपला धडा शिकवेल असे प्रतिपादन शिवसेनेचे संपर्क प्रमुख जयंत दिंडे यांनी केले.

कांदा निर्यात बंदी करणे, शेतकऱ्यां बाबत चुकीचे धोरण आखणे, महागाई आदी  सर्व कारणांनी जनतेत भाजप बद्दल प्रचंड रोष व राग असून जनता भाजपला सत्तेतून घालवणार आहे. पण त्यासाठी सर्वांनी एकजुट दाखवत निशाणी मतदारांपर्यंत पोहचवून यश मिळवावे असे आवाहन माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी केले. महाविकास आघाडीचा उमेदवार हा सर्वसामान्य आहे तरी त्यांच्या प्रचाराची धुरा सर्वांनी घ्या. मी निफाड तालुक्याची पूर्ण जबाबदारी घेतो. लोकशाही वाचविण्यासाठी सर्वांनी एक संघपणे काम करत मोठ्या मताधिक्याने यश मिळविण्यासाठी प्रयत्न करा असे सांगितले. यावेळी निरीक्षक आमदार सुनील भुसारा, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन आहेर, माजी आमदार अनिल कदम, शिरीष कोतवाल, हेमंत भोसले, कोंडाजी आव्हाड, गणेश धात्रक, सुधीर कराड, शिवा सूरासे, संजय जाधव, भास्कर गावित, सतीश देशमुख, भगीरथ शिंदे, राम चौरे, संतोष देशमुख, विजय जाधव, रामभाऊ ढगे, संतोष भालेराव, विलास भवर, शरद आहेर, आत्माराम घुमरे, गजानन शेलार, संदीप पवार, सुधाकर मोरे, प्रताप पाटील, प्रकाश शेळके, सचिन कड, संगीता पाटील, तानाजी पगार आदी उपस्थित होते. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष अशा तीनही महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या सूचना मांडल्या. यावेळी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे, गोकुळ पिंगळे, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते,प्रवीण जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते. आभार राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष दत्तात्रेय पाटील यांनी मानले.

महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांना मदतीचा ओघ सुरूच असून जिल्ह्यातील शिक्षक हे मोठी मदत निधी देणार असल्याचे भगीरथ शिंदे यांनी सांगितले. तर माजी आमदार हेमंत भोसले, गणेश धात्रक यांनी एक लाख रुपये निधी दिला. दिंडोरी तालुक्यातील पन्नास गावातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते स्वखर्चाने मतदारसंघातील जिल्हा परिषद गट निहाय प्रचार यंत्रणा राबविणार आहे. तसेच एक नोट एक वोट हे अभियान राबविण्यात येणार आहे. तालुका निहाय प्रचार समिती प्रत्येक तालुक्यात महा विकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे तालुकाध्यक्ष यांची प्रचार समिती गठीत करण्यात येणार असून संयुक्त प्रचार दौरा दहा एप्रिल पासून मतदार संघातील प्रत्येक जिल्हा परिषद गट व शहरांमध्ये होणार आहे.

हेही वाचा –

The post दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादी करणार संयुक्त प्रचार दौरा, ठाकरे गटही लावणार ताकद पणाला appeared first on पुढारी.