नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क – लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज सोमवार (दि.20) रोजी मतदान होत आहे. धुळे, दिंडोरी, नाशिक मतदारसंघात मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केल्याचे दिसून येत आहे. नाशिक मतदार संघात दुपारी ३ पर्यंत 39.41 टक्के तर दिंडोरी लोकसभा मतदार संघात 45.95 टक्के मतदान झाले आहे. धुळे लोकसभा मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 39.97 टक्के मतदान झाले आहे.
धुळे ग्रामीण – 42.34 टक्के
धुळे शहर – 38.41 टक्के
शिंदखेडा – 39.55 टक्के
मालेगांव मध्य – 43.68 टक्के
मालेगांव बाहृय – 38.00 टक्के
बागलाण – 37.69 टक्के