देवळा तालुक्यात डॉ. भारती पवार यांच्या प्रचार सभेत गोंधळ

भारती पवार, www.pudhari.news

देवळा(जि. नाशिक) ; केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे मंगळवारी दि. ७ रोजी देवळा तालुक्यातील पुर्व भागात प्रचारा दरम्यान विविध ठिकाणी ग्रामस्थांनी स्वागत केले. तसेच उमराणे येथेही ढोलताशाच्या गजरात समर्थकांकडुन स्वागत करण्यात आले. यावेळी डॉ. पवार यांनी प्रथम श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. तसेच भगवान श्री. रामेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात ग्रामस्थांशी सुसंवाद साधत असताना ग्रामस्थांकडून पाण्याचा व विकास कामाच्या मुद्यावर मोठा उद्रेक बघायला मिळाला. वातावरण काही काळ तणावग्रस्त झाल्यामुळे गाव प्रतीनिधींना संबधितांची समजूत घालण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. कभि खुशी, गभी गम अशीच परीस्थिती सध्या तालुक्याच्या पुर्व भागात दिसुन येत आहे.  तालुक्याच्या पूर्व भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. प्रलंबीत अशा चनकापूर झाडी एरंड गावं वाढीव कालवा, आरोग्य सुविधेचा बोजवारा, नाफेड व कांदा निर्यात बंदी आदी विषयांचा रोष यावेळी ना. पवार यांना पत्करावा लागला. यावेळी डॉ. पवार यांनी जनतेशी सवांद साधत मतदान करण्याचे गावकऱ्यांना आवाहन केले.

यावेळी आमदार डॉ. राहूल आहेर, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर, माजी अध्यक्ष दादा जाधव, भुषण कासलीवाल, डॉ. आत्माराम कुभार्डे, उमराणे बाजार समितीचे सभापती प्रशांत देवरे, उमराणे विकास सोसायटीचे चेअरमेन सुनिल देवरे, शिवसेना शिदे गटाचे देवानंद वाघ, दिपक निकम, भाजपा जिल्हा महिला आघाडीच्या बबीता देवरे, दत्तु देवरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा –