धक्कादायक ! जळगावात चोरीच्या संशयातून तरुणाचा खून, 5 संशयितांना अटक

जळगाव

जळगाव : पुढारी वृत्तसेवा- येथील कांचन नगर परिसरात राहणाऱ्या एका तरुणाला चोरीच्या संशयावरून त्याच्याच परिसरातील चार जणांनी तालुक्यातील असोदा शिवारात नेऊन मारहाण केली. या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप मयत तरुणाच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

शहरातील कांचन नगर परिसरात राहणारा ज्ञानेश्वर पंढरीनाथ बाविस्कर उर्फ पंच्छी (वय-३५) या तरुणाने शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या घरात चोरी केल्याचा संशय शेजाऱ्यांना होता. मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर याला सोबत घेऊन चार ही जण दुचाकीवर बसवून गेले. ज्ञानेश्वर याचा मृतदेह असोदा शिवारात पडलेला असल्याची माहिती दुपारी २ वाजेच्या सुमारास त्याच्या कुटुंबीयांना आणि पोलिसांना मिळाली.

घटनेची माहिती कळताच लागलीच शनिपेठ, तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसह ठसे तज्ञ ,फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहचली. पोलिसांनी 5 संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी दिली.

हेही वाचा –

The post धक्कादायक ! जळगावात चोरीच्या संशयातून तरुणाचा खून, 5 संशयितांना अटक appeared first on पुढारी.