धक्कादायक | दारू सोडविण्याचे औषध घेतल्यानंतर एकाचा मृत्यू

दारु पिणे

इगतपुरी(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- दारू सोडविण्याचे औषध घेतल्यानंतर एकाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील नांदूरवैद्य येथे घडली आहे. याप्रकरणी वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून, तपासाअंती संबंधितावर गुन्हा दाखल होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

याबाबत माहिती अशी, शिरूर (ता. वैजापूर) येथील रवींद्र गोविंद बोर्डे (५०) हे २४ एप्रिल रोजी नांदूरवैद्य येथील एका बाबाकडे नातेवाइकांसह दारू सोडण्याचे औषध घेण्यासाठी आले होते. औषध घेतल्यानंतर बोर्डे यांना उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यांना पुढील उपचारासाठी २५ एप्रिलला नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले गेले. वैद्यकीय अधिकारी शिंदे यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदन होऊन व्हिसेरा तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. त्याच्या अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक राजू पाटील यांनी दिली आहे.

हेही वाचा –