धक्कादायक ! नाशिकच्या भावली धरणात बुडून पाच जणांचा मृत्यू

बुडाले

इगतपुरी (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा : इगतपुरीच्या भावली धरणावर फिरण्यासाठी आलेल्या पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकरोड येथून रिक्षा घेऊन धरणावर फिरण्यासाठी आलेल्या पाच जणांचा धरणात बुडून मृत्यू झाला आहे. आज (दि. 21) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.

मृतांमध्ये तीन मुली व दोन मुलांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे. स्थानिक आदिवासी नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.