धुळे : सामोडे येथे पुतळा अनावरण, स्मृती प्रकाशन सोहळा उत्साहात 

सामोडे पुतळा अनावरण सोहळा,www,pudhari.news

पिंपळनेर(साक्री); पुढारी वृत्तसेवा ; सामोडे येथे सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक व अध्यक्ष स्व. दयाराम शिंदे, संस्थेच्या संचालिका जयवंतबाई शिंदे यांच्या पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव विश्वासराव धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी स्मृती विशेषांकाचे प्रकाशन मा.आ. राजवर्धन कदमबांडे, सुभाष देवरे, मा. जि.प. अध्यक्ष शिवाजीराव दहिते, अपूर्व हिरे, आमदार कुणाल पाटील, डॉ. गुलाबराव मराठे यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार कुणाल पाटील, जे.टी. देसले यांनी शैक्षणिक व सामाजिक कार्याची माहिती दिली. बी.एस. पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले, तर अंजली शिंदे हिने दादांचे आपल्या नातवांविषयी असलेले प्रेम हे आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

कार्यक्रमाप्रसंगी इयत्ता दहावीतील विद्यार्थिनींनी नृत्य सादर करत मान्यवरांचे स्वागत केले. स्व. दादांचा जीवनपट व त्यांनी केलेले समाज हिताची कार्य हे मोठ्या पडद्यावर दाखविण्यात आले. व्यासपीठावर माजी खासदार बापूसाहेब चौरे, उत्तमराव देसले, विजय सनेर, भाऊसाहेब सोनवणे, उत्तमराव देसले, दर्यावगिर महंत, शामकांत पाटील, सुरेंद्रराव मराठे, विजय पवार, संजय पाटील, नाशिक जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, डॉ. बन्सीलाल बाविस्कर, शिरीष सोनवणे, रूपचंद शिंदे, गोविंदराव एखंडे, शिवाजी बेडसे, पराग बेडसे, प्रतापराव बेडसे, शंकराव शिंदे, विनायक देवरे, प्रताप बेडसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी दत्तात्रय शिंदे, शांताराम शिंदे, प्रकाश शिंदे, शरद शिंदे, संजय शिंदे, विजय शिंदे, वसंतराव शिंदे, अनिल शिंदे, विनोद शिंदे, हंसराज शिंदे, गिरीश शिंदे, नंदलाल शिंदे, ज्ञानेश शिंदे, सचिन शिंदे, कार्तिक शिंदे, अंजली शिंदे, गुंजन शिंदे, दर्शन शिंदे, प्राचार्य, मुख्याध्यापिका सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ व जयदया शिक्षण प्रसारक मंडळ सामोडे या तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुनम देसले व प्रशांत कोतकर यांनी केले, तर प्रास्ताविक मनीषा शिंदे व कुणाल बेनुस्कर यांनी केले. आभार कार्तिक शिंदे यांनी मानले.

हेही वाचा :

The post धुळे : सामोडे येथे पुतळा अनावरण, स्मृती प्रकाशन सोहळा उत्साहात  appeared first on पुढारी.