धूलिवंदन खेळून तलावात अंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

जळगाव : पुढारी वृत्तसेवा- धूलिवंदन खेळून आंघोळीसाठी गेलेल्या धरणगाव येथील एका तरुणाचा धरणगाव तालुक्यातील जांभोरे गावाजवळ बुडून मृत्यू झाला. (दि. २५) रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास ही घटना उघड झाली. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

धरणगाव येथील ज्ञानेश्वर काशिनाथ महाजन हा तरुण सकाळी धूलिवंदन खेळल्यानंतर  आपल्या तीन ते चार मित्रांसोबत धरणगावजवळ असलेल्या जांभोरा शिवारात असलेल्या तलावावर अंघोळीसाठी गेला होता. अंघोळीसाठी पाण्यात उडी घेतल्यानंतर काही वेळातच  ज्ञानेश्वर बुडायला लागला. मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही.. तो आई, वडील, भाऊ, बहिणीसह राहत होता. मोलमजुरी करून त्याचे वडील कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते.

हेही वाचा :

The post धूलिवंदन खेळून तलावात अंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू appeared first on पुढारी.